Home राष्ट्रीय आदित्य ठाकरे यांची राज्य सरकारकडून पद्म पूरस्कार समितीच्या अध्यक्षपदी निवड!

आदित्य ठाकरे यांची राज्य सरकारकडून पद्म पूरस्कार समितीच्या अध्यक्षपदी निवड!

0

भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी राज्य सरकारकडून मान्यवरांची शिफारस केली जाणार आहे यासाठी राज्य सरकारकडून एक समिती तयार करण्यात आली आहे.

या समितीच्या अध्यक्षपदी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे सोबतच समितीत 5 कॅबिनेट, 2 राज्यमंत्री, प्रधानसचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी अशा 9 सदस्यांचाही समावेश असणार आहे. आता समिती ची जबाबदारी यांच्या वर असणार आहे.आताच या समितीची निवड करण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून बनविण्यात आलेल्या समितीमध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे या लोकांचा समावेश असणार आहे.