Home राजकीय ‘अयोध्या कोणाच्या बापाची नाही आणि विश्व हिंदू परिषदेने जास्त वळवळ करु नये’...

‘अयोध्या कोणाच्या बापाची नाही आणि विश्व हिंदू परिषदेने जास्त वळवळ करु नये’ – विजय वडेट्टीवार

0

अभिनेत्री कंगना रनौत प्रकरणावरून विश्व हिंदू परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येऊ नका असा इशारा दिला आहे त्यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अयोध्या कोणाच्या बापाची नाही असे म्हणत मुख्यमंत्र्याची पाठराखण केली.

याविषयी मंत्री विजय वडेट्टीवार बोलले की विश्व हिंदू परिषद धर्माचे मालक नाहीत. विश्व हिंदू परिषदेत फक्त हिंदू नाव आल्याने धर्म त्यांचा होत नाही . आणि आम्ही हिंदू नाही का? तसेच त्यांनी जास्त वळवळ करू नये असे ते बोलले. विश्व हिंदू परिषदेने राष्ट्रीय भानगडीत पडू नये असेही ते बोलले.

तसेच ज्या दिवशी वाटलं त्या दिवशी उद्धव ठाकरे जातील. अयोध्या कोणाच्या बापाची नाही, आणि कोणाची हिम्मत असेल तर रोखून दाखवावं . हा प्रश्न धर्माचा आणि भावनेचा आहे. अयोध्या आंदोलन आणि विश्व हिंदू परिषद असाही सवाल मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.