Home राष्ट्रीय केंद्र सरकारची लग्न समारंभांना परवानगी, मात्र वऱ्हाड ५० लोकांपेक्षा जास्त नसावे

केंद्र सरकारची लग्न समारंभांना परवानगी, मात्र वऱ्हाड ५० लोकांपेक्षा जास्त नसावे

0

कोरोना व्हायरस मूळे अडकून पडलेल्या लग्न समारंभांना आज केंद्राने होकार दर्शवला आहे, मात्र त्यासाठी काही नियमांची पूर्तता करावी लागेल.

लग्न समारंभ सुरू असताना जर ५० पेक्षा जास्त लोक उपस्तिथ असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट आदेश केंद्राकडून जारी करण्यात आले आहेत. आज आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्या यांनी मीडिया समोर येत पुढच्या उपाय योजना आणि नियम यांची यादी जाहीर केली ती खालीलप्रमाणे,

(१)प्रत्येकाला तोंडावर कापड/मास्क घालणे आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवणे सक्तीचे आहेत,
(२) तसेच या ठिकाणावर पान वा घुटखा खाऊन थुंकणे हे सुद्धा गुन्ह्यास पात्र असेल.
(३) कुठल्याच संस्थेला एकावेळी ५ पेक्षा जास्त लोकांना जमा होऊ देण्याचे कुठलेच प्रावधान नाही. (४)लग्न तथा तत्सम समारंभांना ५० पेक्षा जास्त नागरिक हजर राहू शकत नाहीत.
(५) एखाद्या इसमाच्या अंत्यविधिस २० लोकांपेक्षा जास्त लोक जमा होऊ शकत नाहीत.

या सर्व नियमांचे पालन करत असतांना सुरक्षित अंतर ठेवणे हे बंधनकारक आहे.

मे महिना हा सगळीकडे लग्नसमारंभांचा महिना म्हणून विख्यात आहे तर लॉकडाउन सुरू झाल्यानंतर सरकारने सर्व लग्न समारंभांवर बंदी घालत मॅरेज हॉल वाल्याना ग्राहकांचे पैसे परत देण्यास बजावले होते. आता या नियमानंतर ज्यांची रखडलेली लग्ने आहेत ती पटापट उरकली जाणार हे नक्की.