Home आरोग्य भारतात कोरोना आजारावरील लसीचे निरीक्षण तिसऱ्या टप्प्यात!

भारतात कोरोना आजारावरील लसीचे निरीक्षण तिसऱ्या टप्प्यात!

0

भारतातील कोरोना लसीच्या उत्पादनावर सोमवारी तज्ज्ञांची बैठक झाली. तसेच ही लस सर्वप्रथम कोणाला देण्यात येणार यासारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

कोरोना झाल्यावर तो व्यक्ती च्या शरीरात अँटिबॉडी तयार करतो त्यामुळे अद्याप ज्या व्यक्तींना कोरोना च संसर्ग झालेला नाही त्यांचा विचार सर्वप्रथम करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही म्हटले आहे, की आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना सर्वप्रथम लस दिली जायला हवी. कोरोनाच्या संसर्ग सहजपणे होईल अशा व्यक्तींनाही या वयोगटात ठेवले गेले आहे. तयार करण्यात येणाऱ्या 3 लसी ह्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे तसेच एका लसीचे तिसऱ्या टप्प्यात निरीक्षण सुरू आहे अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी दिली.