Home तंत्रज्ञान डॉ. रेड्डीज लॅब नंतर मुंबईतील आणखी एका कोरोना लस बनवणाऱ्या फार्मा कंपनीवर...

डॉ. रेड्डीज लॅब नंतर मुंबईतील आणखी एका कोरोना लस बनवणाऱ्या फार्मा कंपनीवर सायबर हल्ला

0

देशभरातील अनेक मोठमोठ्या फार्मा कंपन्यांमध्ये कोरोनावर लस शिधण्यासाठी संशोधन सुरु आहे. अशातच फार्मा कंपन्यांवर सायबर हल्ले होत असल्याचे दिसून येत आहे. जवळपास १५ दिवसांपूर्वी डॉ. रेड्डीज लॅब या फार्मा कंपनीवर सायबर हल्ला झाला होता. त्यानंतर आता मुंबईतील लुपिन या प्रसिद्ध फार्मा कंपनीवरही तशाच स्वरूपाचा सायबर हल्ला झाल्याचे समजले. १५ दिवसांत २ फार्मा कंपन्यांवर सायबर हल्ला झाल्याने इतर फार्मा कंपन्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलं आहे.

न्यूज १८ लोकमतच्या मीडिया न्यूजनुसार हे सायबर हल्ले औषधांबद्दलची माहिती मिळवण्यासाठी झाले असावे. तज्ज्ञांच्या मते, भारतातील फार्मा कंपन्या स्वस्त दराची औषधे व कोरोना लस बनवण्यावर भर देत असल्याने हॅकर्स या कंपन्यांना टार्गेट करत असण्याची शक्यता आहे. सायबर पोलीस या हल्ल्यांची माहिती मिळवून हॅकर्सचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. लुपिन च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्याचा महत्वाच्या कामकाजावर काही परिणाम झाला नाही. तरी कंपनीची बरीच खाजगी माहिती चोरी गेली असल्याची शक्यता आहे.