Home तंत्रज्ञान किराणा माल, भाजीपाला घरपोच पोहचवणाऱ्या बिग बास्केट कंपनीवर सायबर हल्ला; 2 कोटी...

किराणा माल, भाजीपाला घरपोच पोहचवणाऱ्या बिग बास्केट कंपनीवर सायबर हल्ला; 2 कोटी भारतीयांची खासगी माहिती गेली चोरीला

0

किराणा माल, भाजीपाला, फळे, स्टेशनरी, क्रॉकरी अशा कित्येक वस्तू घरपोच पोहचवणाऱ्या बिग बास्केट या कंपनीवर मोठा सायबर हल्ला झाला. या सायबर हल्ल्यात तब्बल २ कोटी भारतीय लोकांची खाजगी माहिती चोरीला गेली. सामनाच्या मीडिया न्यूजनुसार ही चोरी गेलेली माहिती डार्पवेब वर ३० लाख रुपयांना विकली जात आहे. बंगळूरू येथील सायबर क्राईम सेलमध्ये याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या तक्रारीनंतर सायबल या रिसर्च टीमला वेब मोनिटरिंगमधून हा डेटा ४० हजार डॉलर्सला विकला जात असल्याचे आढळून आले. सायबल इंकच्या रिपोर्टनुसार या चोरीला गेलेल्या माहितीमध्ये ग्राहकांची नवे, मोबाईल नंबर्स, इमेल आयडी, पासवर्ड, पिन, पत्ता, जन्मतारीख या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. तसेच लोकांचे ओटीपी देखील चोरीला गेले आहेत. ही घटना ३० ऑक्टोबर रोजी झाली असल्याचे बिग बास्केटच्या व्यवस्थापकांनी सांगितले.