Home राष्ट्रीय फॅक्ट चेक: मोदी सरकार महिलांच्या खात्यांमध्ये जमा करणार १.२४ लाख रुपये? वाचा...

फॅक्ट चेक: मोदी सरकार महिलांच्या खात्यांमध्ये जमा करणार १.२४ लाख रुपये? वाचा व्हाट्सऍपवर फॉरवर्ड होत असलेल्या या मेसेजचे सत्य

0

सोशल मीडियावर फॉरवर्ड होणारे मेसेज बऱ्याच वेळा बनावट स्वरूपाचे व फसवे असतात. त्यावर कित्येक लोक विश्वासही ठेवतात. अशाच स्वरूपाचा एक मेसेज गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत होता. या मेसेजमध्ये ‘मोदी सरकार सर्व महिलांच्या खात्यांमध्ये १.२४ लाख रुपये जमा करणार असल्याचे सांगितले जात होते. ‘स्त्री स्वाभिमान योजने’ अंतर्गत हे पैसे पाठवले जाणार असल्याचेही त्यात सांगण्यात आले होते. या मेसेजमध्ये स्त्रियांची वैयक्तिक माहिती व बँक अकाऊंटची माहिती पाठवण्यास सांगितले गेले होते. मात्र हा मेसेज खोटा असल्याचे कळते आहे.

PIB फॅक्ट चेक ने या मेसेजची सत्यता पडताळून तो पूर्णपणे खोटा व बनावट असल्याचे आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सांगितले आहे. शिवाय अशा फसव्या मेसेजेसला बळी पडून आपली वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका अशी सूचनाही या ट्विटमध्ये करण्यात आली आहे. आपले बँक अकाउंटचे डिटेल्स कोणासोबत शेअर केल्यास खात्यातील पैसे जाण्याचा धोका असतो. तसेच केंद्र सरकारच्या कुठल्याही योजनेची माहिती मिळाल्यास ती आधी केंद्राच्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन पडताळून पाहावी व मगच त्यावर विश्वास ठेवावा असेही PIB ने आपल्या ट्विटमध्ये सांगितले.