Home राष्ट्रीय चार लाख सरकारी पदे अजूनही रिक्त !

चार लाख सरकारी पदे अजूनही रिक्त !

0

प्राईम नेटवर्क : केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या अस्थापनांमध्ये २०१६मध्ये सुमारे चार लाख १२ हजार ७५३ पदे रिक्त होती, अशी माहिती सरकारतर्फे बुधवारी लेखी उत्तरात लोकसभेत देण्यात आली. अजूनही चार लाखाच्यावर सरकारी पदे भरायची आहेत असे या लेखी उत्तरातून दिसून आले आहे.

रिक्त पदांची आकडेवारी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या २०१६-१७साठीच्यावेतन व भत्त्यांबाबतच्या अर्थ मंत्रालयातर्फे १ मार्च २०१६ रोजी प्रकाशित वार्षिक अहवालावर आधारित असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. ही पदे भर्तीच्या नियमांनुसार संबंधित उद्योग, विभाग व संस्थांतर्फे भरणे गरजेचे आहे, असे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी नमूद केले. विविध मंत्रालये व सरकारी विभागांमध्ये रिक्त होणारी पदे भरणे ही सातत्यपूर्ण प्रक्रिया असून, तिची अंमलबजावणी व्हायला हवी, असेही ते म्हणाले.

सरकारी रिक्त पदे अ श्रेणीमध्ये १५,२८४. ब श्रेणीत ७६,०५० तर क श्रेणीत ३,२१,४१८ इतकी आहेत. चला तर मग अभ्यास करणार्‍यानो;विद्यार्थी मित्रमैत्रीणिंनो मागच्या परीक्षेत निकाल खराब लागला म्हणून नाराज न होता आणखीन जोमाने अभ्यासाला लागा.