Home राष्ट्रीय भारत सरकार खूप पैसेवाले झालं आहे, मी घेतलेलं कर्ज मला इच्छा असताना...

भारत सरकार खूप पैसेवाले झालं आहे, मी घेतलेलं कर्ज मला इच्छा असताना फेडू देत नाहीत : विजय मल्ल्या

0

९००० करोड रुपयांचा घोटाळा करून लंडन ला फरार झालेला किंगफिशर कंपनीचा मालक विजय मल्ल्याने एक हैराण करणारे वक्तव्य केले आहे.

विजय मल्ल्याने बुधवारी ट्विट करत म्हटले की, ” सरकारने २० लाख करोड रुपयांचे पॅकेज जनतेला दिले त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. पण मला सुद्धा मदत करायची आहे, मी घेतलेल्या कर्जाची पै अन पै परत करायची आहे असं सांगून सुद्धा मला माझे कर्ज फेडू देत नाहीत”.

विजय मल्ल्याने केलेल्या दाव्यांमध्ये किती सत्यता आहे हे अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान विजय मल्ल्याला इंग्लड मधील उच्च न्यायालयात ब्रिटनमधून हाकलून लावण्यासाठीची लढाई हरला आहे. आता इंग्रज सरकार हाकलून देत असल्याचे पाहून विजय मल्ल्या ने मगरीचे अश्रू वाहायला सुरवात केली आहे.

ललित मोदी, विजय मल्ल्या, निरव मोदी ह्या बड्या उद्योजकांनी करोडोंची कर्जे काढली आणि आपल्या देशातून पळ काढला. आपल्या घामाची धार लावून गरीब जनतेने बँकेत जमा केलेल्या पैशावर ह्या नराधमांनी डल्ला टाकत देशासोबत विश्वासघात केलेला आहे. एवढं मोठं कर्ज घेतल्यानंतर यांच्याकडून परतपेढी साठी पुरेसे प्रयत्नसुद्धा नीट होताना दिसत नाहीत. एकीकडे मात्र फक्त १० हजारापर्यंत कर्ज परत न करू शकल्यामुळे हजारो शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत हे दुर्दैवी आहे.