Home महाराष्ट्र मुंबई आशियातल्या सगळ्यात मोठ्या झोपडपट्टी धारावीत एकाचा कोरोनाने मृत्यू! प्रशासनाचे धाबे दणाणले

आशियातल्या सगळ्यात मोठ्या झोपडपट्टी धारावीत एकाचा कोरोनाने मृत्यू! प्रशासनाचे धाबे दणाणले

0

मुंबईतील कोरोना रुग्णांची भीती वाढण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच एका खूप धक्कादायक बातमी समोर आली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीमध्ये ५६ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या रुग्णाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या १७०० पार गेली आहे. दिल्लीतील मरकज येथे झालेल्या परिषदेनंतर देशभरात कोरोना पसरणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यात धारावीत कोरोना रुग्ण सापडल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे.

२३ मार्च रोजी त्यांना ताप व इतर लक्षणे दिसत असल्याने हे रुग्ण स्थानिक डॉक्टरांकडे गेले होते. त्यानंतर २६ मार्च रोजी त्यांनी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर १ एप्रिल रोजी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. म्हणजेच लक्षणे दिसल्यानंतर तब्बल ९ दिवसांनी ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या व्यक्तीची कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. त्यांचे एकेजी नगर येथे गार्मेंटचे दुकान आहे.
आज दुपारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत तब्बल ५००० लोक क्वारंटाइनमध्ये असल्याचं सांगितलं होतं. त्यातच आता सर्वाधिक कोरोना पसरले अशी भीती असलेल्या धारावीत कोरोनाग्रस्त आढळून आल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.