Home राष्ट्रीय पाकिस्तानच्या ३ विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश करत बॉम्ब फेकले, भारताची चोख कारवाई

पाकिस्तानच्या ३ विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश करत बॉम्ब फेकले, भारताची चोख कारवाई

0

प्राईम नेटवर्क : भारताने पाकिस्तानच्या बाळकोट इथं केलेल्या एअरस्ट्राईक मुळे बिथरलेला पाकिस्तान दबावाला बळी पडून, काश्मीरच्या पुंच आणि राजौरी परिसरात बॉम्ब टाकल्याची माहिती, पीटीआय या वृत्त संस्थेने दिली आहे, पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी सकाळी १०:४५ दरम्यान भारताच्या नौशेरा सेक्टरमध्ये हवाई हद्दीत घुसखोरी केली, घुसखोरी करून परतत असताना, त्यांनी या परिसरात बॉम्ब टाकून हि विमाने पसार झाली आहेत, या विमांना भारतीय वायू दलाने हाकलून लावले. यामध्ये सध्या जीवित झाल्याची कुठली हि माहिती सरकारी सूत्रांकडून मिळू शकली नाही.

भारताला आम्ही योग्य वेळी योग्य उत्तर देऊ

एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तानच्या आर्मी चिफने भारताला आम्ही योग्य वेळी योग्य उत्तर देऊ अशी दर्पोक्ती काल केली होती. त्यानुसार सकाळ पासून भारतीय सीमेवर पाकिस्तानच्या सीमेरेषेवरून गोळीबार सुरु केला आहे, पाकिस्तानच्या सीमेरेषेवर जमवाजमव सुरु आहे. एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तानचा अपमान झाल्यामुळे पाकिस्तान सध्या बिथरला आहे.

भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान तांत्रिक कारणामुळं कोसळलं

सकाळच्या सुमारास बडगाममधील कलाम गावात भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान तांत्रिक कारणामुळं कोसळलं आणि यामध्ये एक वैमानिक आणि स्थानिक नागरिक मृत्युमुखी पडला आहे.

एअरस्ट्राईक नंतर पुन्हा एकदा तिन्ही दले सज्ज

दरम्यान, एअरस्ट्राईक मुळे बिथरलेल्या पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी भारत सक्षम असून सर्वत्र सीमा रेषेवर हायअलर्ट जारी केला गेला आहे, एअरस्ट्राईक नंतर पुन्हा एकदा तिन्ही दले सज्ज झाली आहेत.

भारताने सध्या पाकिस्तानची चहू बाजूंनी नाकेबंदी केली आहे

अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला दम दिला असून पाकिस्तान मधील दहशतवादी तळांवर कारवाई करा असं ठणकावलं आहे, यात ऑस्ट्रेलियाने सुद्धा भारताची बाजू घेतली आहे, तर फ्रांस ने आपण भरता सोबत असल्याची कल्पना देत, भारत जी कारवाई करेल, त्याचं आम्ही समर्थन करतो असं म्हटलं आहे, तर चीनने दहशतवादी मसूद अझर वर बंदी टाकण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे.

भारताने सध्या पाकिस्तानची चहू बाजूंनी नाकेबंदी केली आहे, भारताने आयात निर्यात बंद केल्या नंतर खेळ, मनोरंजन, आंतरराष्ट्रीय व्यापार अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर पाकिस्तानवर मात केली आहे.