Home राष्ट्रीय तबलिघी जमातीच्या सदस्यांना आता भारतात ‘नो एन्ट्री’ : गृह मंत्रालय

तबलिघी जमातीच्या सदस्यांना आता भारतात ‘नो एन्ट्री’ : गृह मंत्रालय

0

दिल्ली येथील निझामुद्दीन परिसरात झालेल्या तबलिगी समाजाच्या मरकझमध्ये सहभागी झालेल्या विदेशी नागरिकांबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने कठोर कारवाई केली आहे. मरकझमध्ये सहभागी झालेल्या 960 हून जास्त विदेशी नागरिकांना 10 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट करण्यात आलं आहे.

विविध राज्य सरकारांनी मशिदी आणि धार्मिक कार्यक्रमांना तबलिगींची अवैध हजेरीबाबात माहिती गोळा केल्यानंतर केंद्राने ही कारवाई केली आहे. दिल्ली येथील तबलिगी मरकज च्या कार्यक्रमाला ८ हजाराहून अधिक लोकांनी हजेरी लावली होती. यातील अनेकांना नंतर कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते.

ज्यांना काळ्या यादीत टाकले आहेत ते आता पुन्हा भारतात येऊ शकणार नाहीत.तबलिगींपैकी अनेक परदेशी नागरीक हे पर्यटन व्हिसावर भारतात आले होते. काळ्या यादीत टाकलेल्या नागरिकांवर व्हिसा नियमांचे उल्लंघण आणि साथीचा रोग कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.