Home आरोग्य WHO च्या महासंचालकांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!

WHO च्या महासंचालकांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!

0

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यात भारताचे कामअग्रेसर मानले जात आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टी. ए. गेब्रेएसस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटद्वारे आभार व्यक्त केले आहेत. बुधवारी अर्थात ११ नोव्हेंबरला नरेंद्र मोदी आणि WHO यांच्यात कोरोना संकटाबाबत जागतिक पातळीवर भागीदारीबद्दल फोनवरचर्चा झाली.

त्यावेळी नरेंद्र मोदींनी भारतात कोरोना लसीसाठी चालू असलेल्या संशोधनाची व कोवॅक्स लसीबद्दलची माहिती WHO ला दिली. याबद्दल ट्विटमध्ये सांगतांना टी. ए. गेब्रेएसस म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोनवर झालेल्या महत्वाच्या चर्चेत त्यांनी कोरोनासोबतच इतरही रोगांवर लक्ष देणे आवश्यक आहे असे मत मांडले. तसेच WHO ने विकसनशील देशांच्या आरोग्य यंत्रणांना केलेल्या मदतीचे त्यांनी कौतुक केले.”

तसेच नरेंद्र मोदींनी देखील ट्विट करून या चर्चेबाबत सांगितले व WHO चे आभार मानले.