Home राष्ट्रीय कोरोनाचा दोष फक्त तबलिगींनाच का दिला जात आहे?” – असदउद्दीन ओवेसी

कोरोनाचा दोष फक्त तबलिगींनाच का दिला जात आहे?” – असदउद्दीन ओवेसी

0

“तबलिगी प्रकरण झाल्या नंतर देशात ‘करोना-जिहाद’ बाबत अतिशय दुष्ट प्रचार केला जात आहे. हे सगळेच्या सगळे प्रयत्न देशामधील मुसलमानांना बदनाम करण्यासाठी होत आहेत. तबलिगी जमातीला दोष देताना हे लक्षात घ्यायला हवं की याच वेळी संसदेचे अधिवेशन सुद्धा सुरू होतं आणि अयोध्येमध्ये कार्यक्रम घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर रामलल्लाची मूर्ती सुद्धा हलवली होती, मग दोष फक्त आमच्या तबलिगीनाच का दिला जातोय?” असा उद्विग्न प्रश्न ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे अध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार असलेले असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला आहे. 

“करोना-जिहादबाबत प्रचार हा अत्यंत चुकीचा असा आहे, कारण आजार हा काही जात आणि धर्म पाहून येत नाही. हिमाचल प्रदेशमध्ये तर एका मुस्लिम मुलाला टोमणे मारून मारून एवढा त्रास देण्यात आला की त्या बिचार्‍याने शेवटी आत्महत्या केली आणि मग असे लक्षात आले की करोनासाठी केलेल्या चाचणीचा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह होता. मुसलमान समाजाचे लोक अन्नामध्ये थुकतात, फळांना थुंकी लावतात हे व्हिडीओ सुद्धा खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे!”, असे ओवेसी यांनी सांगितले.

लोकसत्ताला दिलेल्या विशेष मुलाखतीत औवैसी यांनी  “आपण एका अशा होडी मध्ये आहोत ही जी होडी एका भयंकर तुफानामध्ये अडकली आहे. बाहेरच्या तुफानाचा मुकाबला करून या होडीला सहीसलामत त्यातून बाहेर काढायचे झाल्यास या होडीमध्ये दुसरं कुठलं तुफान माजू नये याची तेवढीच काळजी घ्यायला हवी,” असे आवाहन त्यांनी केले