Home राजकीय भाजपला आणखी एक धक्का, आता हे खासदार करणार काँग्रेसमध्ये प्रवेश.

भाजपला आणखी एक धक्का, आता हे खासदार करणार काँग्रेसमध्ये प्रवेश.

0

प्राईम नेटवर्क : भाजपचे बिहारमधील खासदार किर्ती आझाद येत्या 15 जानेवारी रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.किर्ती आझाद हे सध्या बिहारमधील दरभंगा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. दरभंगा मतदारसंघातून आझाद यांनी सलग तीन वेळा विजय मिळवत हॅट्ट्रिक नोंदवली आहे. मात्र, किर्ती आझाद यांनी दिल्ली क्रिकेट मंडळात (डीडीसीए) घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यावेळी डीडीसीएची जबाबदारी भाजपचे ज्येष्ठ नेते व अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे होती. त्यामुळे आझाद आणि जेटली यांच्यात संघर्ष सुरू होता.

किर्ती आझाद हे पेशाने क्रिकेटर राहिले आहेत. 1983 च्या भारताने जिंकलेल्या विश्वचषक विजेत्या संघात किर्ती यांचा समावेश होता. 1980 ते 86 या काळात भारतीय क्रिकेट संघात असलेले आझाद 7 कसोटी सामने व 25 एकदिवसीय सामने खेळले आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आझाद यांनी राजकारणात प्रवेश केला. आझाद एका मोठ्या राजकीय कुटुंबियांतून येतात. त्यांचे वडिल भागवत झा आझाद 1988 ते 1989 मध्ये बिहारचे मुख्यमंत्री होते. 1993 मध्ये किर्ती यांनी दिल्लीतून राजकारणाचा श्रीगणेशा केला. दिल्लीतील गोल मार्केटमधून पहिल्यांदा ते आमदार झाले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा गृहराज्य बिहारकडे वळविला. सध्या दरभंगा येथून सलग तीन वेळा भाजपच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले आहेत.

किर्ती आझाद यांनी डीडीसीएचे प्रमुख अरूण जेटली यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर भाजपचे किर्ती आझाद यांना निलंबित केले होते. जेटली यांची ओळख मोदी गटातील अशी आहे. त्यामुळे आझाद यांनी जेटली यांच्यानंतर मोदींनाही लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. त्याचवेळीस ते पक्षात बंड करणार असल्याचे सुतोवाच मिळाले होते. राम मंदिराच्या मुद्द्याचा भाजपच्या जाहीरनाम्यात समावेश करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेचा विश्वासघात केला असल्याची टीका काही दिवसापूर्वी आझाद यांनी केली होती.