Home राजकीय मध्य प्रदेशातील मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य; हेमा मालिनीच्या गालांसारखे रस्ते चकाचक करण्याचे केले...

मध्य प्रदेशातील मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य; हेमा मालिनीच्या गालांसारखे रस्ते चकाचक करण्याचे केले आश्वासन

0

राजकीय नेत्यांची विकासकामांची आश्वासने आपल्याला काही नवीन नाहीत. बऱ्याचदा आश्वासनं देतांना नेत्यांचा तोल सुटतो व त्यामुळे ते चर्चेचा विषय बनून जातात. याचेच एक उदाहरण म्हणजे मध्य प्रदेशातील जनसंपर्क मंत्री पी सी शर्मा यांनी काल १५ ऑक्टोबरला रस्त्यांवरील खड्ड्यांवर केलेले वादग्रस्त वक्तव्य. १५ ते २० दिवसांत रस्ते हेमा मालिनीच्या गालांसारखे चकाचक होतील असे आश्वासन त्यांनी दिले असे मीडिया न्यूजवरून समजले.

मीडिया न्यूजनुसार काल जनसंपर्क मंत्री पी सी शर्मा हे भोपाळमधील रस्त्यांच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना भोपाळमधील खराब रस्त्यांची तुलना त्यांनी भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांच्या गालांशी करीत ‘१५-२० दिवसांत हे रस्ते हेमा मालिनीच्या गालांसारखे चकाकतील’ असे ते बोलले. त्यामुळे शर्मा हे मोठा चर्चेचा विषय बनले असून या वादग्रस्त विधानाचे पुढे काय परिणाम होतील हे वेळच सांगेल.