Home खेळ स्पर्धा आयपीएल २०२० फायनल: सूर्यकुमार यादवच्या या कामगिरीचे होत आहे भरभरून कौतुक!

आयपीएल २०२० फायनल: सूर्यकुमार यादवच्या या कामगिरीचे होत आहे भरभरून कौतुक!

0

मंगळवारी अर्थात १० ऑक्टोबरला आयपीएल २०२० चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत करून मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवला. या विजयामुळे मुंबई इंडियन्स संघ आयपीएल ट्रॉफीचा पाचव्यांदा मानकरी ठरला. या सामन्यात मुंबईच्या रोहित शर्मा, ट्रेंट बोल्ट, ईशान किशन या खेळाडूंनी लक्षणीय कामगिरी केली. ट्रेंट बोल्ट व रोहित शर्मा काही दिवसांपूर्वी दुखापतग्रस्त असूनही त्यांनी या सामन्यात उत्तम खेळी दिल्यामुळे दोघांचेही कौतुक होत आहे. मात्र यांच्याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादवचेही विशेष कौतुक केले जात आहे.

अंतिम सामन्यानंतर सोशल मीडियावर सूर्यकुमार यादववर कौतुकाचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सामन्याच्या ११व्या ओव्हरमध्ये दिल्लीचा अश्विन गोलंदाजी करत असतांना रोहित शर्मा फलंदाजी करत होता तर दुसऱ्या बाजूला सूर्यकुमार होता. अश्विनच्या बॉलिंगवर रोहितने फटका मारला व धाव काढण्यासाठी धावला. सूर्यकुमारने त्याला धावायला नकार देत होता मात्र तोपर्यंत रोहित शर्मा बॉलर्स पिचमध्ये पोहचला होता. त्यावेळी रोहित शर्मा बाद झाला असता परंतु सूर्यकुमारने ते स्वतःवर घेऊन रोहित शर्मासाठी तो स्वतः पिचच्या बाहेर झाला व बाद झाला. सामन्यानंतर याबद्दल सूर्यकुमारला विचारले असता त्याने सांगितले की, “रोहित शर्मा त्यावेळी फॉर्ममध्ये होता आणि त्याने अर्धशतकही पार केले होते. तो बाद झाला असता टीमचे नुकसान झाले असते म्हणून मी स्वतःच्या विकेटचे बलिदान केले.” या कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवने भरभरून कौतुक होत आहे.