Home खेळ स्पर्धा मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जखमी; फायनलमध्ये खेळू शकेल का हा प्रश्न

मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जखमी; फायनलमध्ये खेळू शकेल का हा प्रश्न

0

काल झालेल्या मुंबई विरुद्ध दिल्ली या आयपीएलच्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीला पराभूत करून मुंबईने अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात मुंबईचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने जबरदस्त खेळी दिली. त्याने एकाच ओव्हरमध्ये दिल्लीच्या अजिंक्य रहाणे व पृथ्वी शॉ या दोन्ही खेळाडूंना शून्य धावांवर बाद केले. यामुळे दिल्लीला २०१ धावांचे लक्ष गाठता आले नाही.

मीडिया न्यूजनुसार ट्रेंट बोल्टला क्षेत्ररक्षण करतांना दुखापत झाल्यामुळे १४ व्या ओव्हरनंतर त्याला खेळाबाहेर जावे लागले. त्यामुळे तो केवळ २ ओव्हरमध्ये गोलंदाजी करू शकला. ग्रॉइन इंज्युरी झाली असल्याने तो अंतिम सामन्यापूर्वी बरा होऊन सामना खेळू शकेल की नाही हा प्रश्न सर्वांसमोर आहे. जर बोल्ट फायनलमध्ये खेळू शकला नाही तर मुंबईसाठी तो मोठा धक्का असेल असे मीडिया न्यूजमध्ये सांगण्यात येत आहे.