Home खेळ स्पर्धा नरेंद्र मोदींनी भावुक होऊन लिहिले धोनीला पत्र!

नरेंद्र मोदींनी भावुक होऊन लिहिले धोनीला पत्र!

0

महेंद्रसिंग धोनी टीम इंडिया चे माजी कर्णधार यांनी 15 ऑगस्ट रोजी निवृत्ती जाहीर केली. त्यासाठी त्यांना अनेक दिग्गज कलाकारांनी तसेच मोठ्या लोकांनी पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यातच नरेंद्र मोदींनी सुद्धा पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत तसेच कौतुक केले आहे. धोनीने पंतप्रधान मोदी यांचे पत्र ट्विट करून त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला आणि आभार मानले.

नरेंद्र मोदींच्या पत्राला धोनीने ट्विट करून आभार मानले आहे. त्यात तो बोलला की, एका कलाकाराला किंवा खेळाडू ला नेहमीच त्याच्या कौतुकाची अपेक्षा असते. त्यांच्या मेहनतीचे आणि बलिदानाचे महत्व सर्वांनी ओळखावे असे वाटते’, असे धोनीने ट्विट केले.

नरेंद्र मोदींनी लिहिलेल्या पत्रात ते बोलले की,धोनीमध्ये नवीन हिंदुस्थानचा आत्मा झळकतो, जिथे तरुण आपल्या स्वतःच्या बळावर यश आणि नाव कमावतात’.पुढे ते बोलले की, ‘गेल्या दीड दशकात देशासाठी केलेल्या कार्यासाठी आम्ही तुझे आभारी आहोत’. इतिहासात तुझे नाव सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम कर्णधार आणि सर्वोत्तम यष्ठिरक्षक म्हणून घेतले जाईल.