Home खेळ स्पर्धा सानिया मिर्झाची बहीण झाली माजी क्रिकेट कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांची सून!...

सानिया मिर्झाची बहीण झाली माजी क्रिकेट कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांची सून! अनमचं घटस्फोटानंतर हे दुसरं लग्न…

0

माजी भारतीय क्रिकेट कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांचा मुलगा असदुद्दीन आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिची बहीण अनम याचा यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटात गुरुवारी संपन्न झाला. लग्नात नामवंत हस्ती सहभागी झाल्या होत्या त्याचबरोबर स्वतः सानिया traditional लुक मध्ये सर्वांची मने जिंकत होती. मटा च्या एका रिपोर्ट नुसार अनमचं हे दुसरं लग्न असून या आधी तिचं लग्न व्यावसायिक अकबर रशीदशी झालं होतं. अकबरशी घटस्फोटानंतर ती आता असद सोबत लग्न करीत आहे.

लग्न सोहळा आटोपल्यावर असदुद्दीने सोशल मिडीवर लग्नाचे फोटो पोस्ट करून “शेवटी जिच्यावर प्रेम केलं तिच्याशीच लग्न केलं” अशी पोस्ट केली. तर सानियाने देखील लग्नाचे फोटो पोस्ट करून “कुटुंबात स्वागत आहे असद” अशी पोस्ट केली.