Home जागतिक जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याची पाकिस्तानच्या जेलमधून गुप्तपणे सुटका…

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याची पाकिस्तानच्या जेलमधून गुप्तपणे सुटका…

0

फेब्रुवारी २०१९ मध्ये काश्मीरमधील पुलवामा येथे झालेला आतंकवादी हल्ला ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेने घडवून आणला होता हे आपल्याला ठाऊक असेलच. हे समोर आल्यावर या संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याला पाकिस्तानने अटक केले होते. परंतु गुप्तचर विभागाने सरकारला नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने मसूद अजहरची जेलमधून गुप्तपणे सुटका केली आहे. तसेच राजस्थानच्या सीमेवर पाकिस्तानी सैन्य तैनात करण्यात आल्यामुळे गुप्तचर विभागाने सतर्क राहण्याचा इशाराही भारत सरकारला दिला आहे.

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. या गोष्टीचा काटा काढण्यासाठी भारतावर मोठा हल्ला करण्याचा कट पाकिस्तानमध्ये रचला जात असल्याचं वृत्त ‘हिंदुस्थान टाइम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राने दिलं आहे. मसूद अजहरची सुटका याच कारणासाठी केली गेली असेल असे अंदाज वर्तविले जात आहेत. मागील आठवड्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका भाषणात कलम ३७० चा निषेध केला होता आणि भारतावर हल्ला करण्याचा अप्रत्यक्ष संकेतही दिला होता.