Home जागतिक ५०,००० भारतीयांच्या उपस्थितीत ह्युस्टनमध्ये ‘हाउडी मोदी’ कार्यक्रम साजरा

५०,००० भारतीयांच्या उपस्थितीत ह्युस्टनमध्ये ‘हाउडी मोदी’ कार्यक्रम साजरा

0

अमेरिकेच्या टेक्सासमधील ह्युस्टन या शहरात ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमासाठी मोदी अमेरिकेला गेले आहेत. ह्युस्टनमधील एनआरजी स्टेडियममध्ये हा कार्यक्रम काल मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच अमेरिकेतील ५० हजार भारतीय लोक या कार्यक्रमाला हजर होते. याशिवाय भारतात देखील सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे बरेच कौतुक होत असल्याचे दिसत आहे.

अमेरिकास्थित भारतीयांनी भारतात काय चालले आहे हे जाणून घेणे हे ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. कार्यक्रमातील भाषणात बोलतांना मोदींनी ‘भारतात सर्व छान चालले आहे’ असं अनेक भारतीय भाषांमध्ये सांगितलं. तसेच ट्रम्प यांनी आपल्या भाषणात ‘अमेरिका आणि भारत मिळून एकत्रितपणे सुरक्षा व्यवस्था भक्कम करत असून लवकरच दहशतवादाचा बंदोबस्त करणार आहेत’ असे सांगितले. त्यानंतर मोदींनी हिंदीमध्ये दिलेल्या भाषणात भारतात चालू असलेल्या विकासकामांचे आणि देशातील बदलांचे वर्णन केले. प्रेक्षकांचा या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला. मोदींनी सर्व प्रेक्षकांचे तसेच अमेरिकेचे ट्विटद्वारे आभार मानले.