Home आध्यात्मिक “भगवान राम हे नेपाळचे, भारतात असलेली अयोध्या खोटी”, नेपाळचे पंतप्रधान के पी...

“भगवान राम हे नेपाळचे, भारतात असलेली अयोध्या खोटी”, नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली

0

नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली हे मागील महिन्यापासून चर्चेत आहेत, भारतासोबत सीमाभागातील काळापाणी आणि लिपुलेख या भारतातील भागांवर नेपाळची मालकी असल्याचे त्यांनी सांगितले होते, यावेळी मात्र त्यांनी हद्द पार केली , “भारतातील कोट्यवधी जनतेचे श्रद्धास्थान म्हणजे भगवान राम हे अयोध्येत जन्माला आलेले नसून ते नेपाळ मध्ये जन्मले आहेत म्हणजेच ते नेपाळी आहेत”असे आश्चर्यकारक विधान त्यांनी केले.

प्रधानमंत्री के पी शर्मा ओली यांच्या अशा अजब दाव्यांमुळे नेपाळमधील नागरिक त्यांचा कडाडून निषेध करत आहेत आणि पंतप्रधानपदी असणाऱ्या माणसाने भारतविरोधी कार्य सुरू ठेवणे हे नेपाळी जनतेला कदापि चालणार नाही असे तेथील विरोधी पक्षांनी नेपाळ संसदेत बजावून सांगितले.

दरम्यान भारत आणि नेपाळ हे पुरातन काळापासून एकमेकांना सहकार्य करत आले आहेत, इसवी सन पूर्व सहाव्या शतकात सुदधा नेपाळमधील राजकन्या यांचे भारतातील राजकुमारांसोबत विवाह केले जात असायचे. सद्यस्तिथीला नेपाळ मध्ये हिंदू बहुल लोकसंख्या असून भारतातील सांस्कृतिक वारसा आणि येथील धर्म संकल्पना नेपाळ मध्ये पाहायला मिळते. १९४७ नंतर भारत सरकारने नेपाळ मध्ये अनेक लोकोपयोगी प्रकल्प पूर्ण केले असून, नेपाळमध्ये जाण्यासाठी कुठल्याही visa आवश्यक नसल्याचा कायदा सुद्धा पारित केलेला आहे.