Home जागतिक Halloween Special: जाणून घ्या काय आहे हॅलोविन आणि या दिवशी भोपळ्याला का...

Halloween Special: जाणून घ्या काय आहे हॅलोविन आणि या दिवशी भोपळ्याला का महत्व असते?

0

पाश्चिमात्य देशांत ३१ ऑक्टोबर हा दिवस भुतांचा दिवस म्हणून साजरा केला जातो. तिकडे अशी मान्यता आहे की या दिवशी मृतात्मे पृथ्वीवर मेजवानीसाठी येतात. म्हणूनच या दिवशी बरेच लोक पार्टीचे आयोजन करून केक आणि इतर खास पदार्थ बनवतात व पार्टीला येणारे लोक एक विशिष्ट अशी भुतांसारखी वेशभूषा करून येतात. लोकसत्ताच्या रिपोर्टनुसार अमेरिकेतील अनेक देशांमध्ये हॅलोविन नाईट विविध पद्धतींनी साजरी केली जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे लोक या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होतात. तसेच लहान मुले शेजाऱ्यांच्या घरी जातात व ‘ट्रिक ऑर ट्रीट’ असे म्हणतात. मग त्यांना खाऊ मिळतो.

या दिवसाची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे ‘जॅको लँटर्न्स.’ भडक केशरी रंगाच्या भोपळ्यापासून बनवलेल्या या लँटर्न्सला या दिवशी विशेष महत्व असते. या भोपळ्यात डोळे नाक तोंड असलेला थोडा भयानक दिसणारा असा चेहरा कोरलेला असतो. या भोपळ्याच्या आत एक मेणबत्ती किंवा दिवस ठेवून त्याला हॅलोविनच्या दिवशी सर्वजण घराबाहेर ठेवतात. हा भोपळा दुरून पाहिल्यास भुतासारखा दिसतो. तसेच हा भोपळा भयानक व दृष्ट आत्म्यांना आपल्या घरापासून दूर ठेवतो अशी मान्यता असल्याने हॅलोवीनच्या दिवशी त्याला विशेष महत्व असते.