Home जागतिक मोदींचा व्हिडीओ व्हायरल…

मोदींचा व्हिडीओ व्हायरल…

0

७ दिवसांसाठी अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ह्युस्टनमध्ये गेले होते. तिथे त्यांनी अमेरिकेतील काश्मिरी पंडितांची भेट घेतली. यावेळी घडलेल्या एक छोट्याश्या घटनेतून मोदींनी तेथील सर्वांचे मन जिंकले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मोदी विमानातून उतरल्यावर विमानतळावर उपस्थित काश्मिरी पंडितांच्या प्रतिनिधी मंडळाने मोदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी जमिनीवर फुल पडले असता मोदींनी ते उचललं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातून मोदींचा साधेपणा दिसून आला तसेच स्वच्छता अभियानाचे ते किती पालन करतात हे ही समजले, असे अनेक सोशल मीडिया पोस्ट्समध्ये या घटनेचे वर्णन करण्यात आले आहे. याशिवाय काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याबद्दल काश्मिरी पंडितांनी मोदींचे अत्यंत आभार मानले.

अमेरिकेच्या टेक्सासमधील ह्युस्टनमध्ये आयोजित केलेल्या ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.