Home जागतिक विक्रमशी संपर्काच्या प्रयत्नांत नासाही सहभागी!

विक्रमशी संपर्काच्या प्रयत्नांत नासाही सहभागी!

0

विक्रम लँडरशी तुटलेला संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्याचे इस्रोच्या वैज्ञानिकांचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत हे आपण ऐकलेच असेल. चंद्रापासून अवघ्या २.४ किमी अंतरावर असतांना विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने भारताची चांद्रयान – २ मोहीम अद्याप तरी यशस्वी झालेली नाही. याबद्दल अमेरिकन संस्था नासानेही ट्विटरच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले. परंतु विक्रमशी संपर्क साधण्यासाठी इस्रोच्या चाललेल्या अथक प्रयत्नांना पाहून नासाने मदतीचे हात पुढे केले आहेत. सहा दिवस होऊन गेले तरीही संपर्क होऊ शकला नाही पण इस्रोचे प्रयत्न अजूनही चालूच आहेत हे लक्षात घेऊन नासानेही विक्रम लँडरला संदेश पाठवून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला व भारताला मदतीचं आश्वासन दिलं. यासाठी नासाने इस्रोची परवानगी देखील घेतली होती असे नासाच्या सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार समजले आहे.

नासाने आपल्या डीप स्पेस नेटवर्कच्या (DSN) जेट प्रपल्शन लॅबोरेटरीमधून ‘हॅलो’ असा रेडिओ संदेश विक्रमला पाठवला. विक्रमला सूर्यापासून ऊर्जा मिळत आहे आणि लँडिंगनंतर म्हणजेच ८ सप्टेंबरनंतर केवळ १४ दिवसांसाठीच विक्रमला सूर्याचा प्रकाश मिळणार आहे. त्यामुळे आणखी केवळ १० दिवस संपर्काचे प्रयत्न सुरू ठेवता येणार येणार आहेत.