Home जागतिक सना मरीन ठरली जगातली सर्वात कमी वयाची पंतप्रधान !

सना मरीन ठरली जगातली सर्वात कमी वयाची पंतप्रधान !

0

सना मरीन जगातली सर्वात कमी वयाची पंतप्रधान ठरली आहे. फिनलँडच्या राजकारणात मरिन यांनी केवळ 27 व्या वर्षी प्रवेश केला होता. जिद्ध आणि चिकाटीच्या बळावर 2014 मध्ये त्या पक्षाच्या उपाध्यक्ष झाल्या. 2019 मध्ये देशातील ट्रान्सपोर्ट आणि कम्यूनिकेशन मंत्रालयाची जबाबदारी घेऊन त्यांनी उत्तमरीत्या पार पाडली.

आणि आता नुकताच रविवारी फिनलँच्या सोशल डेमोक्रेट पार्टीने पंतप्रधान पदासाठी 34 वर्षीय सना मरीन यांची निवड केली आहे. हे पद भूषवून त्यांनी केवळ देशात नाही तर जगातले सर्व रेकॉर्ड तोडून इतिहास घडवला आहे. कारण त्या जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधान ठरल्या आहेत. निवडणुकांमध्ये बाजी मारून मरीन यांनी अँटि रिने यांची जागा अर्थात पंतप्रधान पद पटकावलं. जगभरातील बडे नेते त्यांना आता पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.