Home जागतिक भारत-चीन सीमेवर तणाव कायम!

भारत-चीन सीमेवर तणाव कायम!

0

चीन आणि भारत सीमेवर तणाव कायम असून 29 आणि 30 ऑगस्ट ला चीन ने लडाख सीमेवरून घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न भारतीय सैनिकांनी मोडून काढला आहे.तर चीनच्या मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने भारताला उघड धमकी दिली आहे. भारताला आमच्याशी कोणतीही स्पर्धा करायची असल्यास त्यांना १९६२ पेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागेल, असा इशारा ग्लोबल टाईम्सने दिला आहे.

भारतीय जवानांनी जशास तसे उत्तर दिल्याने चिनी सैनिकांचा घुसखोरी चा डाव उघडून पडला आहे. पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्याजवळ भारत आणि चीनचे जवर यांच्यात चकमक झाली. भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने चिनी सैन्याला घुसखोरी करता आली नाही.

यानंतर आता चीन सरकारने पुन्हा एकदा बोलून प्रश्न सोडवण्याची भाषा सुरू केली. तर चिनी सरकारच्या ग्लोबल टाईम्सने भारताला थेट धमकी दिली आहे. भारताने म्हटले की ‘भारतानं चिनी सैन्याला आधीच रोखले.

तर ग्लोबल टाइम्स ने लिहिले आहे की भारताची परिस्थिती सद्या वाईट आहे. रविवारी भारतात ७८ हजार कोरोना रुग्ण आढळले. त्यांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील तणाव वाढवून भारत देशातील समस्यांवरून लक्ष विचलित करू पाहतोय.