Home जागतिक तुर्कस्तानमध्ये भयानक भूकंप; १८ ठार, ५०० जखमी

तुर्कस्तानमध्ये भयानक भूकंप; १८ ठार, ५०० जखमी

0

तुर्कस्तान मधील पूर्वेकडील राज्यांमध्ये रात्री आठच्या सुमारास ६.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा तीव्र हादरा नोंदवण्यात आला आहे. हा धक्का इतका भयानक होता की यामध्ये १० पेक्षा जास्त इमारती जमीनदोस्त झाल्या, ज्यात १८ जण ठार झाले झाले अशी माहिती मिळत आहे. या घटनेत ५०० हून अधिक जखमी लोकांवर उपचार चालू आहेत. मात्र मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

तुर्कस्तानमध्ये रात्री ८ च्या सुमारास सिवरिस शहराच्या १० किमी क्षेत्रामध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले. हे धक्के ४०-४० सेकंदांच्या अंतराने असे ६० धक्के जाणवले. लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं व लोक घाबरून बाहेर रस्त्यावर आले. घाबरलेल्या लोकांना सरकारने ताबडतोब मदतकार्य पुरवले अशी माहिती लोकमतच्या एका रिपोर्ट नुसार मिळत आहे.